

mira from tula japnar aahe
esakal
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. मालिकेतील प्रत्येक पात्र त्यांना आपल्याच घरातील सदस्य वाटतं. त्यामुळेच मालिकेतील एखादं पात्र बदललं किंवा त्यात काही वेगळं वाटलं तर प्रेक्षकांच्या ते लगेच लक्षात येतं. त्यामुळेच झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुला जपणार आहे' मध्ये झालेले बदलही प्रेक्षकांनी दाखवून दिले होते. काही दिवस मालिकेतील मीराचं पात्र साकारणारी मुख्य अभिनेत्री गायब होती. ती परत आल्यावर तिच्या नाकावर पट्टी होती. तिच्या डोळ्यांचा रंग बदललेला यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या. त्याबद्दल प्रेक्षक विचारणाही करत होते. आता अखेर मालिकेतील मीराने प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.