

girija oak
esakal
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या नॅशनल क्रश बनलीये. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. गिरिजाने लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. त्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. यात तिने निळ्या रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. त्यानंतर ती रातोरात स्टार झाली. आता चाहते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. अशातच गिरीजाची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतेय. यात ती भाजी घेताना दिसतेय. सोबतच तिने तिच्या जेवणाच्या ताटाचा फोटोही शेअर केलाय.