Actress Hema arrested in Bangalore rave party case
Actress Hema arrested in Bangalore rave party caseSakal

Hema: रेव्ह पार्टी प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री हेमाला पोलिसांनी केली अटक

Telugu Actress Hema: रेव्ह पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी हेमासह आठ जणांना नोटीस बजावली होती.

बंगळूर : बंगळूरमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी तेलुगू अभिनेत्री हेमाला (Hema) पोलिसांनी अटक केली आहे. हेमाला या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आजच्या चौकशीदरम्यान हेमाने अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने, तिला अटक करण्यात आली.

रेव्ह पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी हेमासह आठ जणांना नोटीस बजावली होती. मात्र हेमाने सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला होता. त्यानुसार ती आज सीसीबी पोलिसांसमोर हजर झाली.

हेमा म्हणाली, "मी ड्रग्स घेतले नाहीत."

पोलीस स्टेशनच्या बाहेर मीडियाशी बोलताना हेमा म्हणाली, “मी काहीही केले नाही. मी निर्दोष आहे. मी ड्रग्स घेतले नाहीत. मी जो व्हिडिओ शेअर केला होता तो, बेंगळुरूचा नव्हे तर हैदराबादमधील होता. मी हैदराबादमध्ये बिर्याणी बनवतानाचा व्हिडिओही शेअर केला होता."

हेमाने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये तिने दावा केला की, तिचे नाव विनाकारण या प्रकरणात ओढले गेले आणि ती हैदराबादच्या बाहेरील एका फार्महाऊसवर होती.

सीसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, बर्थडे पार्टीच्या बहाण्याने रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अनेक लोक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून आले होते. बेंगळुरूचेही काही लोक होते.

एका माहितीच्या आधारे, सीसीबीने पार्टीच्या ठिकाणी छापा टाकला आणि पार्टीत सहभागी झालेल्यांचे ब्लड सँपल गोळा केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्त तपासणी अहवालानंतर हेमासह 86 जणांची नार्कोटिक्स टेस्ट पॉझिटिव आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीत एकूण 103 जण सहभागी झाले होते. सहभागींमध्ये 73 पुरुष आणि 30 महिलांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com