आमचा सर्वात मोठा आशीर्वाद आला... अभिनेत्री करिश्मा तन्ना झाली आई, गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर दिला गोंडस मुलाला जन्म

KARISHMA TANNA BLESSED WITH BABY BOY: अभिनेत्री करिश्मा तन्ना आई झाली आहे! तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
kriti senon

kriti senon

esakal

Updated on

अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या घरी अखेर चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे! करिश्माने स्वतः सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी समोर येताच तिच्यावर आणि नवजात बाळावर नेटिझन्स आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. करिश्मा आणि तिचा पती वरुण बंगेरा यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर एक जॉइंट पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी बाळाचे आगमन झाल्याचे सांगितले. करिश्माने बाळाच्या छोट्या पावलांचा एक अत्यंत गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यावर "तो या जगात आला आहे" असा टॅग पाहायला मिळतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com