

mi savitribai jotirao phule madhurani prabhulkar
esakal
लवकरच छोट्या पडद्यावर 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका सुरू होतेय. स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या या मालिकेकडे प्रेक्षकांचे डोळे आहेतच. सोबतच या मालिकेतील कलाकार ते साकारत असलेल्या पात्रांना योग्य न्याय देतील अशी खात्रीही आहे. कारण मुळात ही मालिका महान क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हे जोतीरावांच्या भूमिकेत तर मधुराणी गोखले सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिच्या मालिकेतील सावित्रीबाई साकारण्याचा प्रवासाबद्दल सांगितलं आहे.