

MONIKA DABADE
ESAKAL
'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री मोनिका दबडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच तिने सोशल मीडियावरून चाहत्यांना आपलंसं केलं. मोनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे वैयक्तिक आयुष्यातील व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. ती स्वतःची कशी काळजी घेते इथपासून तिच्या कपडे आणि बाळापर्यंत सगळंच ती चाहत्यांसोबत शेअर करते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने प्रेग्नन्सीनंतर स्त्रियांच्या शरीरात काय काय बदल होतात आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेत याबद्दल सांगितलं आहे.