Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

Actress Parineeti Chopra husband undergoes eye surgery in London : अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पतीच्या तब्येतीमुळे परिणीती शूटिंग सांभाळून लंडनला फेऱ्या मारते आहे.
Actress Parineeti Chopra husband undergoes eye surgery in London
Actress Parineeti Chopra husband undergoes eye surgery in London

अभिनेत्री परिणीती चोप्राने काही महिन्यांपूर्वीच आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्याशी लग्नगाठ बांधली. उदयपूरमध्ये शाही थाटात पार पडलेल्या त्यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा बराच काळ रंगली होती.

नुकतंच राघव यांच्यावर लंडनमध्ये एक शस्त्रक्रिया पार पडली आणि परिणीती राघव यांना भेटण्यासाठी लवकरच लंडनला जाणार आहे.

Actress Parineeti Chopra husband undergoes eye surgery in London
Parineeti Chopra: प्रेग्नन्सीच्या चर्चेवर अखेर परिणीतीनं सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाली...

राघवसाठी परिणीती कित्येक दिवस लंडन-भारत असा प्रवास करतेय. राघवची काळजी आणि कामाच्या तारखा सांभाळून तिचा हा प्रवास सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

"ती अत्यंत बिझी असतानाही सतत लंडनला फेऱ्या मारते आहे. वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे त्याच्या तपासण्या सुरु असतानाही परिणीती त्याच्या सोबत होती. तिच्या अमरसिंह चमकीला सिनेमाच्या रिलीज दरम्यान खूप व्यस्त असतानाही ती फोनवरून सतत त्याच्या संपर्कात होती आणि त्याच्या प्रकृतीची चौकशी करत होती. " असं राघव यांच्या नातेवाईकांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राघव यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांच्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये छिद्र होतं आणि काही गंभीर समस्याही होत्या. त्यामुळे अतिशय किचकट शस्त्रक्रिया त्यांच्यावर पार पडली असून त्यांच्या डोळ्यांची दृष्टी जाण्याचीही शक्यता होती असं सूत्रांनी सांगितलं होतं.

शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर राघव लंडनमध्येच आराम करत असून त्यांच्या दोन्ही डोळ्यांची सतत तपासणी केली जातेय. डॉक्टरांच्या परवानगीनंतरच ते पुन्हा भारतात परतू शकतात असं सूत्रांनी सांगितलं.

अमरसिंह चमकीला मुळे होतेय परिणीतीची चर्चा

दरम्यान, परिणीतीचा नुकताच 'अमरसिंह चमकीला' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. दिलजीत दोसांज याचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा सिनेमा चांगलाच गाजत असून इम्तियाज अली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं तर या सिनेमात गाजत असणारी गाणी ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केली होती.

Actress Parineeti Chopra husband undergoes eye surgery in London
Parineet-Raghav Engagement: साखरपुड्याच्या आऊटफिट्ससाठी परिणीती- राघव यांनी दिली 'या' दोन रंगांना पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com