
'अंधाधुन' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री राधिका आपटे हिने आठवड्याभरापूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. तिने काही महिन्यांपूर्वी अचानक काही फोटो शेअर करत आपल्या गरोदरपणाची अनांउन्समेंट केली होती. त्यानंतर तिने थेट बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर मुलीला घेऊन काम करतानाचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने आपल्याला मुलगी झाल्याचं सांगितलं होतं. आता राधिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या मॅटर्निटी फोटोशूटने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातलाय.