
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री संभावना सेठ कायम चाहत्यांसोबत जोडलेली असते. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सोबतच ती तिच्या युट्युब चॅनेलमध्ये तिच्या वैयक्तिक गोष्टीही चाहत्यांना सांगत असते. संभावना बिग बॉसमधेही सहभागी झाली होती. नुकतीच अभिनेत्रींच्या आयुष्यात एक वाईट घटना घडलीये. तिला नुकतंच गर्भपाताच्या घटनेला सामोरं जावं लागलंय. तिसऱ्याच महिन्यात तिचा गर्भपात झाल्याने ती प्रचंड दुःखी आहे. तिने तिचं दुःख एका युट्युब व्हिडिओमध्ये बोलून दाखवलंय =. यासगळ्यासाठी तिने डॉक्टरांना जबाबदार धरलंय.