
V SHANTARAM AND SANDHYA
ESAKAL
'दो आंखें बारह हाथ', 'पिंजरा', झनक झनक पायल बाजे', 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली',आणि 'नवरंग' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय दिग्गज अभिनेत्री संध्या शांताराम यांचं आज ४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुःखद निधन झालं. त्या अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांनी व्ही शांताराम यांच्याशी लग्न केलेलं. मात्र त्या व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले. मात्र त्यांच्या वयात खूप अंतर होतं.