
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून संपूर्ण देश अजूनही सावरू शकलेला नाही. २२ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेने सगळेच हादरलेत. या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटत आहेत. प्रत्येक भारतीय नागरिक या घटनेचा निषेध करतोय. अनेक कलाकारांनीदेखील याचा निषेध केलाय. या घटनेनंतर काश्मीरला जाऊ नका असं म्हटलं जातंय. मात्र एका मराठी अभिनेत्रीने याविरुद्ध भूमिका घेतली आहे. काश्मीरला जाऊ नका असं म्हणणाऱ्यांवर अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केलीये.