Sonakshi Sinha Video : लग्नानंतर सोनाक्षीने सोशल मिडीयावर शेयर केला जहीरचा असा व्हिडीओ.. नेटकरी झाले अवाक !

Sonakshi Sinha shared video of Zaheer on social media : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेला झहीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Sonakshi Sinha
Sonakshi SinhaEsakal

Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. दोघांनी साध्या अंदाजात रजिस्टर लग्न केलं आणि मुंबईच्या एका हॉटेलात रिसेप्शन पार्टी केली. यावेळी सोनाक्षी आणि जहीरचा परिवार, मित्रमंडळी आणि काही ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. रिसेप्शनलाही अनेक बॉलीवुड कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ मात्र सोशल मिडीयावर आठवड्याभरापासून व्हायरल होत आहेत.

नुकतच सोनाक्षीने सोशल मिडीयावर पती जहीरसोबतचा असा काही व्हिडीओ शेयर केला जे पाहुन नेटकरी अवाक झाले आहेत. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नानंतरही त्यांच्या सोशल मिडीयावर लग्नाचे विविध फोटो पाहायला मिळत आहेत. यातच सोनाक्षीच्या नव्या व्हिडीओने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलय. या व्हिडीओत दोघांचं लग्नानंतरच आयुष्य कसं सुरुय हे पाहायला मिळतय.या व्हिडीओतून सोनाक्षीने जहीरचं भरभरुन कौतुक केलय. सोनाक्षीच्या हिल्सच्या चपला जहीरने स्वत: हातात घेतलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. सोनाक्षीला तिने घातलेल्या हिल्सचा पायांना त्रास झाला आणि म्हणूनच जहीरने त्या चपला स्वत:च्या हातात घेतल्या आहेत. याच कारणामुळे सोनाक्षी जहीरला ग्रीन फ्लॅग म्हणत त्याचं कौतुक करताना दिसतेय. नुकतच लग्नबंधनात अडकलेल्या या कपलने सध्या सोशल मिडीयावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलय. सोनाक्षीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केला होता, या व्हिडीओत तिने लिहीलं होतं की, "जेव्हा तुम्ही ग्रीन फ्लॅग व्यक्तिसोबत लग्न करता.."

सोनाक्षी आणि जहीरचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. शिवाय यावर चाहत्यांनी कमेंट्स करण्यासही सुरुवात झालीय. नेटकऱ्यांनी देखील ग्रीन फ्लॅग असलेल्या जहीरचं तोंडभरुन कौतुक केलंय.

Sonakshi Sinha
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हानंतर 'ही' अभिनेत्री चढणार बोहल्यावर? बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल, कोण आहे तो?

२३ जून रोजी सोनाक्षी आणि जहीरने लगीनगाठ बांधली होती. यावेळी कुटुंबाच्या उपस्थितीत दोघांनी रजिस्टर लग्न केलेला व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर सोनाक्षी आणि जहीरने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक चढ उताराला सामोरं जात दोघांनी लग्न केलं त्यामुळे या लग्नातही सोनाक्षी भावुक झालेली पाहायला मिळाली होती.

Sonakshi Sinha
Sonakshi Sinha Choker : सोनाक्षीने रिसेप्शनला नेसलेल्या साडीपेक्षा तिच्या हिरव्या चोकरचीच जास्त चर्चा; किंमत जाणून व्हाल हैराण.!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com