Actress Sonali Bendre Praised Dashavtar Movie
esakal
Premier
सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."
Actress Sonali Bendre Praised Dashavtar Movie : दशावतार या आगामी सिनेमाचं अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कौतुक केलं. काय म्हणाली सोनाली जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाच्या ऑस्करच्या मुख्य स्पर्धेतील निवडीवर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. मराठी संस्कृती, परंपरा आणि कलावारसा जागतिक व्यासपीठावर पोहोचत असल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केलं आहे.

