
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी ज्योती हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती 'नागीन' या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. सुरभी नुकतीच लग्नबंधनात अडकली. तिने सहा महिन्यांपूर्वी सुमित सूरी याच्याशी लग्न केलं. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुरभीने त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल भाष्य केलंय. त्यांच्या घरात त्या दोघांच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत. त्यामागचं कारणही तिने सांगितलंय.