
मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत सिंगल पॅरेन्ट म्हणजेच एकट्याने मुलांना वाढवणाऱ्या अभिनेत्रीची संख्या मोठी आहे. पटत नाही म्हणून नवऱ्यापासून वेगळं होऊन या अभिनेत्री स्वतःच्या हिमतीवर मुलांचा सांभाळ करतात. तर काही अभिनेत्री लग्न न करता मुलं दत्तक घेऊन आई होण्याची इच्छा पूर्ण करतात. यासाठी लग्न करण्याची किंवा एखाद्या पुरुषासोबत राहण्याची गरज त्यांना वाटत नाही. अशीच एक अभिनेत्री आता लग्न ना करता आई होणार आहे. ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे.