
Entertainment News : २००५ साली परिणीता मधील सौम्य आणि सोज्वळ ललिताद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विद्या बालन हिने गेल्या २० वर्षांत बॉलिवूडमध्ये एक वेगळी जागा निर्माण केली आहे. लगे रहो मुन्नाभाईमधील जान्हवीपासून ते भूल भुलैयाच्या मंजुलिकेपर्यंत, द डर्टी पिक्चर मधील बोल्ड सिल्कपासून ते शेरनी च्या संयमी आणि ठाम विद्या पर्यंत, तिने प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. कहानी, इश्किया, शकुंतला देवी, तुम्हारी सुलु, मिशन मंगल सारख्या सिनेमांनी विद्या केवळ अभिनेत्री नाही, तर एक सशक्त कथा-वक्ता म्हणून प्रस्थापित झाली. आणि आता, भूल भुलैया ३ मधून मंजुलिकेच्या पुनरागमनासह पुन्हा चर्चेत आली.