
नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट पाणी ने झी चित्र गौरव पुरस्कारात तब्बल 7 पुरस्कार जिंकले असून पाणी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या फुलवंतीला देखील २ पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झालाय.