
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडणारा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत केलीये. 'पाणी', 'चंद्रमुखी' यांसारख्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोठारे हे सिनेसृष्टीतलं मोठं नाव आहे. महेश कोठारेंनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. मात्र एक असा काळ आला होता जेव्हा महेश कोठारे यांचं घर बँकेने जप्त केलेलं. त्यांच्याकडचे पैसे संपले होते. कोठारे कुटुंबावर अतिशय वाईट वेळ आली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने त्यांच्या कुटुंबावरील कठीण कलांकाळाबद्दल सांगितलं आहे.