
बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आदिनाथ कोठारेने नुकतंच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना या खास दर्शनाची झलक दिली आहे. "कालच्या 'नशीबवान' दर्शनाची झलक" असं कॅप्शन देत आदिनाथने बाप्पाच्या दर्शनात दंग झाल्याचं दाखवून दिलं आहे.