ADKITTA MARATHI MOVIE REVIEW
esakal
SAKHI GOKHALE SIDDHARTH CHANDEKAR MOVIE: पालकत्त्व या शब्दामध्ये खूप काही दडलेले आहे. या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. पालकत्व म्हणजे केवळ आई-बाबा होणं नाही तर आई-बाबा झाल्यानंतर येणारी जबाबदारी योग्यरीत्या पार पाडणं आहे. एकमेकाला प्रेम देणं, एकमेकांची काळजी घेणं आणि आपुलकीनं वागणं ही खूप मोठी जबाबदारी असते. दिग्दर्शक आशुतोष परांडकर यांचा झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला अडकित्ता हा चित्रपट पालकत्त्वाची परिभाषा मांडणारा असला तरी कुटुंब, करिअर आणि जबाबदारी यांच्यातील समतोल साधणारा आहे.