

girija oak
esakal
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर, अनेक नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालीये. तिच्या एका व्हिडिओने ती थेट नॅशनल क्रश बनलीये. गिरिजाने लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. त्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. यात तिने निळ्या रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. त्यानंतर ती रातोरात स्टार झाली. आता चाहते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. मात्र या सगळ्यानंतर गिरिजाच्या फॉलोवर्समध्ये किती वाढ झालीये माहितीये का?