
ravi jadhav phulwara
esakal
मराठी चित्रपटसृष्टीत २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अविट ठसा उमटवला होता. आता तब्बल पंधरा वर्षांनंतर त्याच टीमकडून पुन्हा एकदा लोककलेला वंदन करणारा ‘फुलवरा’ हा चित्रपट येत आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला ‘फुलवरा’ हा तमाशा फडावरच्या कलाकारांच्या जीवनावर आधारित नवा चित्रपट आहे. झी स्टुडिओज, उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि मेघना जाधव यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली असून, याची घोषणा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली.