

दोन दिवसांपूर्वी अभिनेते कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. आता आणखी एका अभिनेत्याचं अपहरण करून त्याला १२ तास टॉर्चर केलं गेल्याच कळतंय. पैशांसाठी हा सगळा प्रकार घडला असल्याचं कळतं. या घडल्या प्रकरणानंतर अभिनेत्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे, मात्र या सगळ्यामुळे अभिनेत्याने मोठा धक्का बसला आहे. 'वेलकम' , 'स्त्री २' सारख्या चित्रपटात दिसलेले मुश्ताक खान यांच्यासोबत हे सगळं घडला आहे.