
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये प्राची पिसाट हे प्रकरण खूप गाजतंय. प्राचीला ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिलकर यांनी अश्लील मेसेज करत तिच्यासोबत फ्लर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्राचीने त्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एकच गदारोळ सुरू झाला. सुदेशने याआधी देखील असे मेसेज पाठवले असल्याचं प्राचीने सांगितलं. तिने तसे पुरावे देखील दाखवले. अनेक कलाकारांनी याप्रकरणात प्राचीला पाठिंबा दिला. आता या प्रकरणानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळुन सुदेश यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे.