

aga aga sunbai kay mhanata sasubai movie review
esakal
समीक्षक- संदेश वाहाणे
मराठी सिनेसृष्टीत आता नवनवीन आई मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातलाच एक मोठा सिनेमा म्हणजे 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई'. लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 'बाईपण भारी देवा' नंतर त्यांचा एकही चित्रपट म्हणावा तितका चालला नाही. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना पसंत पडेल याची खात्री आहे. केदार शिंदेंना त्यांच्या दिग्दर्शनातील हरवलेला सूर या चित्रपटाच्या निमित्ताने परत मिळालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाहूया कसा आहे हा चित्रपट?