

Actress Aishwarya Daund shares how her emotionally intense role in Daring – The Baramati File became a milestone in her acting journey.
Sakal
ऐश्वर्या दौंड, अभिनेत्री
कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका माझ्यासाठी नवी शिकवण घेऊन येते. माझा अभिनयाचा प्रवास विविध भूमिका आणि वेगवेगळ्या विषयांच्या चित्रपटांमधून समृद्ध होत गेला आहे. ‘नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत’ आणि ‘राऊडी’ या चित्रपटांमधून मला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता माझ्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘डेरिंग - द बारामती फाइल’. या चित्रपटाची कथा आणि माझ्या पात्राची ताकद मला सुरुवातीपासूनच भावली. आदित्यराजे मराठे प्रॉडक्शनच्या ऑडिशनमध्ये मी माझी तयारी आणि अभिनय सादर केला. दिग्दर्शक डॉ. जयंत जगताप आणि निर्माते आदित्यराजे मराठे यांना माझं काम आवडलं आणि मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा होता.