
मोठ्या पडद्यासोबत छोटा पडदा गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीं ऐश्वर्या नारकर यांनी ९० च्या दशकात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यातही त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. मात्र त्यांच्या काही फोटो आणि व्हिडिओवर अनेक नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसतात. अशाच एका ट्रोलरला थेट फोन लावला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितलाय .