aishwarya narkaresakal
Premier
आमचो कोकण लय भारी! ऐश्वर्या नारकर पोहोचल्या कोकणात, काजू बोंडूपासून बनवला 'हा' पदार्थ, तुम्ही खाल्लाय का?
Aishwarya Narakar Shares Her Special Kaju Bond Recipe: लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी कोकणात जाऊन एक खास पदार्थ बनवलाय.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्यांनी ‘दुहेरी’, ‘या सुखांनो या’, ‘श्रीमंताघरची सून’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वामिनी’ यांसारख्या अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ९०च्या शतकातील त्यांनी अनेक चित्रपट गाजवलेत. गेली २५ वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. त्या नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता ऐश्वर्या कोकणात पोहोचल्यात. तिथला एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.