
कोणताही कलाकार हा आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. कलाकार हा खऱ्या अर्थाने त्याच्या पात्रामुळे ओळखला जातो. काही लोक तर कलाकारांना त्यांच्या नावाऐवजी त्यांच्या पात्राच्या नावाने हाक मारतात. मात्र हे पात्र जर नकारात्मक असेल तर या कलाकारांना प्रेक्षकांच्या रोषालादेखील सामोरं जावं लागतं. प्रेक्षक मालिका आणि सिनेमांमध्ये नकारात्मक भूमिका करणाऱ्या कलाकाराला वाईट म्हणायला मागेपुढे पाहत नाहीत. ते कलाकार खऱ्या आयुष्यातही तसेच आहेत असं त्यांना वाटतं. असाच अनुभव अभिनेत्या ऐश्वर्या नारकर यांना आला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यांनी त्यांचा अनुभव सांगितलाय.