
लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाने ९० चा काळ गाजवला. त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केलंय. सध्या त्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी चाहत्यांची आवडती आहे. नुकतंच या जोडीने नवीन घर घेतलं. वयाच्या पन्नाशीमध्ये त्यांनी नवीन घर घेतल्याने या जोडीने पैशांचं गणित कसं जुळवलं असेल असा प्रश्न अनेकांना पडला. आता ऐश्वर्या यांनी त्यांच्या आर्थिक गणितमागचं सूत्र सांगितलंय.