
मराठी सिनेसृष्टीतील ९० चा काळ गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले. त्या सध्या मालिकांमध्ये सक्रीय दिसतात. त्या सोशल मीडियावरूनही चाहत्यांसोबत जोडलेल्या असतात. त्या त्यांचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचे काही व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात तर काही ट्रोल होतात. अशातच त्यांनी त्यांच्या ट्रोलिंगचा एक किस्सा सांगितलाय. जेव्हा सत्यनारायणाच्या पूजेला स्लिव्हलेस ब्लाउज घालून बसल्याने त्या ट्रोल झालेल्या.