

aishwarya narkar
esakal
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर हे कुटुंब सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ते आपले निरनिराळे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. कधी डान्सचे तर कधी व्यायामाचे. मात्र यात हे कपल अनेकदा ट्रोल होताना दिसतं. मात्र ते दोघेही ट्रोलर्सना जशास तसं उत्तर देताना दिसतात. आताही ऐश्वर्या यांच्या योगाच्या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या यांनी त्याला रिप्लाय दिली. मात्र तो तीथवरच नाही थांबला तर त्याने पर्सनलला देखील मेसेज केला. ऐश्वर्या यांनी स्क्रिनशॉट शेअर करत याबद्दल सांगितलं आहे.