

AISHWARYA SHETE.
ESAKAL
'रमा राघव', 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आज ऐश्वर्या सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा झाली असली तरी करिअरच्या सुरुवातीला मात्र तिला प्रचंड वाईट वागणूक दिली गेली. श्रीमंत घरातील असल्याने तिच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आधीपासूनच होत्या ज्या इतरांकडे नव्हत्या त्यामुळे तिला दुरून येऊन एकटीने राहायचा संघर्ष करावा लागला नाही. त्यासाठीही तिला हिणवलं गेलं. आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिला देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल सांगितलंय.