

BAL TANHAJI
ESAKAL
२०२० साली आलेल्या 'तान्हाजी: जी द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालेलं. १० जानेवारी २०२० मध्ये प्रसारित झालेला हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईतील अत्यंत महत्वाचा मावळा तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित होता. त्यांचं शौर्य, त्यांची महाराजांबद्दलची निष्ठा आणि त्यांचा पराक्रम याबद्दल या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. आता या चित्रपटाच्या ६ वर्षानंतर या चित्रपटाच्या प्रिक्वेलची घोषणा करण्यात आलीये. 'बाल तान्हाजी' असं या चित्रपटाचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे हा सिनेमा पहिलाच एआय ओरिजिनल सिनेमा असणार आहे.