

RANPATI SHIVRAY SWARI AGRA
ESAKAL
दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित 'शिवराज अष्टक' प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. यातील प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आता या अष्टकातील सहावं पुष्प म्हणजेच सहावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो म्हणजे 'रणपती शिवराय स्वारी आग्रा'. या चित्रपटात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. त्या प्रसंगी बोलताना अभिनेते अजय पुरकर यांचा मात्र संयम सुटला. हा चित्रपट बंद पाडण्याचे अनेक प्रयत्न केले गेले असं त्यांनी सांगितलं.