

ajinkya deo on her daughter
esakal
मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आपल्या तडफदार व्यक्तिमत्वाने आणि भारदस्त आवाजाने त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. 'माहेरची साडी', 'माझं घर माझा संसार', 'कशासाठी प्रेमासाठी', 'सर्जा' अशा अनेक चित्रपटातून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अजिंक्य यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते मुलीची काळजी घेताना दिसले होते. अजिंक्य यांची मुलगी तनया देव स्पेशल चाइल्ड आहे. त्यांनी तिच्यासाठी वेगळी शाळा देखील उभारली आहे. आता त्या शाळेत अनेक मुलं शिकत आहेत. पहिल्यांदाच अजिंक्य यांनी त्यांच्या मुलीबद्दल भाष्य केलंय.