shivani surveesakal
Premier
छोटीशी तुळस... लग्नात शिवानीसाठी अजिंक्यने घेतलेला सुंदर उखाणा; ऐकताच खळखळून हसलेली अभिनेत्री
Shivani Surve Anjinkya Nanaware Wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आलाय.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने 'देवयानी' बनून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर ती हिंदी मालिकेतही दिसली. शिवानीच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. अभिनेत्रीने १ फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्याशी लग्नगाठ बांधलेली. आता नुकताच तिने त्यांच्या लग्नातला व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात अजिंक्य तिच्यासाठी उखाणा घेताना घेताना दिसतोय.