
Akshar Kothari Divorce: मराठी अभिनेता अक्षर कोठारी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनंजिंकली. त्याने 'स्वाभिमान' मधून घराघरात स्थान मिळवलं. सध्या त्याची 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. टीआरपी यादीतही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत अक्षर अद्वैत चांदेकरची भूमिका साकारतोय तर त्याच्या सोबत ईशा केसकर मुख्य भूमिकेत आहे. मात्र अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अक्षरने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्याचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे. कोण होती त्याची पत्नी?