
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मीच्या पाउलांनी' घराघरात पाहिली जाते. मालिकेची कथा आणि कलाकार दोन्ही प्रेक्षकांचे आवडते आहेत. या मालिकेत अद्वैत चांदेकर आणि कला चांदेकर ही जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. त्यांचा राग आणि त्यांचं प्रेम हे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं असतं. अशातच आता मालिकेत अद्वैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षर कोठारीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्याच्या आयुष्यात त्याच्या खऱ्या कलाची एंट्री झाली आहे.