A Night That Changed Everything: Akshay Kumar Convoy Car Crashes Into Rickshaw in Mumbai
esakal
Premier
Akshay Kumar : एका क्षणात सगळं बदललं… अक्षय कुमारच्या वाहनाचा भीषण अपघात, रिक्षाचालक मृत्यूशी झुंजतोय, कसा घडला अपघात? Video पाहा
Akshay Kumar Convoy Accident in Mumbai: मुंबईतील अंधेरी–जुहू परिसरात रात्री उशिरा घडलेल्या अपघातात अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील मर्सिडीज कार रिक्षावर पलटी; रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर, पोलिसांकडून तपास सुरू
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार परदेशातील दौऱ्यावरून मुंबईत परतत असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला सोमवारी रात्री अंधेरी-जुहू परिसरात भीषण अपघात झाला. अक्षय यांच्या मर्सिडीज कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षा पूर्णपणे चुरा झाली आणि मर्सिडीज कार पलटी होऊन रिक्षावरच कोसळली.

