मुंबई : यंदाचं वर्ष अक्षय कुमारसाठी फारसं यशस्वी ठरलेलं नाही. या वर्षी तीन चित्रपट फ्लॉप झाले असले तरीही २०२५ मध्ये अक्षय कुमारचे सहा महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत..यंदाच्या वर्षी अक्षय कुमारचे 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'खेल खेल में' आणि 'सरफिरा' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पण हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले..'सिंघम अगेन' आणि 'स्त्री-२' या चित्रपटांमध्ये अक्षय कुमारची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली..Upcoming Bollywood Movie : विक्रांत मासीचा सेक्टर 36 ते विजय वर्माचा IC 814 , आता बॉलिवूडमध्ये येतायत सत्यघटनांवर आधारित सिनेमे .वेलकम टू द जंगल'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बड्या कलाकारांची मांदियाळीच आहे. यात अक्षय कुमारसह रवीना टंडन, संजय दत्त, अर्शद वारसी, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार आहेत..२०२५ मधील अक्षय कुमारचे चित्रपटपुढील वर्षी अक्षय कुमारच्या भूमिकांमध्ये वैविध्य दिसून येणार आहे. २०२५ मध्ये त्याचे ऍक्शन, विनोदी आणि देशभक्तीपर चित्रपट झळकणार आहेत. जाणून घ्या अक्षय कुमारचे कोणकोणते चित्रपट २०२५ मध्ये येणार आहेत..स्काय फोर्स'स्काय फोर्स' हा देशभक्तीपर चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. संदीप केलवानी आणि अभिषेक कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात अक्षय कुमारसह सारा अली खान आणि निमरत कौर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होईल..हाऊसफुल ५अक्षय कुमारची गाजलेली विनोदी चित्रपटांची मालिका म्हणजे हाऊसफुल. यातील पाचवा चित्रपट जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यात रितेश देशमुख आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका असणार आहेत..हेराफेरी ३'हेराफेरी' या गाजलेल्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावळ आणि सुनील शेट्टी हे त्रिकूट पुन्हा एकत्र येत आहे. हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो..जॉली एलएलबी ३या चित्रपटातून अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र झळकणार आहेत. सुभाष कपूर दिग्दर्शित जॉली एलएलबी ३ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे..Bollywood : खिलाडी अक्षय कुमार पुन्हा साकारणार वकील!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.