२०२४ ने खूप काही शिकवलं पण... अक्षया देवधरने सांगितलं गेल्या वर्षभरात केलेली खास गोष्ट, म्हणते- वाईट सुरुवात
Akshaya Deodhar On 2024 Journey: लक्ष्मी निवास मालिकेच्या कलाकारांनी २०२४ मधल्या आपल्या काही खास आठवणी सांगितल्या. ज्यात त्यांनी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत.
झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या 'लक्ष्मी निवास' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत. आता या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या २०२४ च्या आठवणी आणि २०२५ च्या अपेक्षा सांगितल्या आहेत.