
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर हिने पाठक बाई बनून प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिची पहिलीच मालिका प्रचंड गाजली. तब्बल साडेचार वर्ष ही मालिका सुरू होती. त्यानंतर अक्षया पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला दिसेल अशी प्रेक्षकांना आशा होती मात्र त्या मालिकेनंतर ती छोट्या पडद्यावरून गायब झाली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं आहे.