

akshaya naik on her bold scene
esakal
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायम तिची मतं बिनधास्तपणे मांडताना दिसते. ती मराठीसोबतच हिंदी मालिकेतही झळकली आहे. तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही महत्वाची भूमिका साकारली होती. मात्र मध्यंतरी अक्षया गाजलेली ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. अक्षयाने नवरात्रीत बोल्ड फोटोशूट केलं होतं. ज्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलेलं तर अनेकांनी टीका केलेली. आता सकाळ प्रीमिअरला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलंय.