

AKSHAY KHANNA
ESAKAL
सध्या सगळीकडे फक्त रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाचीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटात रणवीर हा एक एजंट दाखवण्यात आलाय जो भारतातून पाकिस्तानात जातो आणि तिथे राहून दहशतवाद्यांची माहिती भारताला पुरवतो. ही कहाणी खऱ्या घटनेवर आधारित असल्याचं सांगण्यात येतं. यात मुंबईत झालेल्या २६ / ११च्या हल्ल्याबद्दलही दाखवण्यात आलंय. यात रणवीरसोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी हे कलाकार आहेत. त्यातही अभिनेता अक्षय खन्ना याच्या अभिनयाची आणि लूकची जोरदार चर्चा रंगलीय. मात्र अक्षय सेटवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जायचा. त्यामागे कारणही तसंच महत्वाचं होतं.