AKSHAY KHANNA

AKSHAY KHANNA

ESAKAL

अर्रर्र खतरनाक! अक्षय खन्नाने केलं प्रभास अन् अल्लू अर्जुनचं गर्वहरण; एका वर्षात बनवला जबरदस्त रेकॉर्ड

AKSHAY KHANNA NEW RECORD: २०२५ हे वर्ष अक्षय खन्नासाठी चांगलं ठरलंय. या वर्षात त्याने दाक्षिणात्य अभिनेत्यांचं देखील गर्वहरण केलं आहे.
Published on

अभिनेता अक्षय खन्ना याच्यासाठी २०२५ हे वर्ष भरभराटीचं ठरलंय. वर्षाच्या सुरुवातीला 'छावा' या चित्रपटात त्याने विक्की कौशलसोबत मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारली होती. तर वर्षाच्या शेवटी आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' मध्ये रणबीर सिंगसोबत त्याने 'रहमान डकैत' या पाकिस्तानी गँगस्टरच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोन्ही भूमिकांसाठी त्याचं अजूनही कौतुक होतंय. आता अक्षय चक्क साऊथच्या अभिनेत्यांचे रेकॉर्ड तोडत आहे. एकाच वर्षात २००० कोटींची कमाई करणारा तो दुसरा भारतीय अभिनेता बनलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com