
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या२७ जूनला सज्ज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच एका दिमाखदार समारंभात प्रकाशित झाला. तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर कलाकारांचा मजेशीर अंदाजही पहायला मिळतोय. प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं.