Allu Arjun Police Custody: धक्कादायक! अल्लू अर्जुनला १४ दिवसांची पोलीस कोठडी; तेलंगणा उच्च न्यायालयाचा निर्णय

Allu Arjun Arrested LIVE Updates: अल्लू अर्जुन याला हैदराबाद येथे झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तेलंगणा कोर्टात हजर करण्यात आलं.
allu arjun
allu arjun esakal
Updated on

'पुष्पा २' प्रदर्शित झाल्यापासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या समोरच्या अडचणी संपायचं नाव घेत नाहीयेत. हैदराबाद येथे थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झालेला. त्याप्रकरणी अल्लू अर्जुनवर कलम लावून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तेलंगणा उच्च न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला अटक केल्यानंतर अभिनेत्याचे सासरे कंचर्ला चंद्रशेखर रेड्डी हे त्याला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. आता या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. अल्लू अर्जुनला १४ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com