

AMAR VISHWAS
ESAKAL
अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने त्यांच्या आगामी 'अमर विश्वास' या ओरिजनल सिरीजचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही मालिका सत्ता, गुन्हेगारी आणि कायदेशीर लढाईवर आधारित एक उत्कंठावर्धक 'कोर्टरूम ड्रामा' आहे. यामध्ये अभिनेता राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत रवी बहल, आमिर अली आणि बरखा बिष्ट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.