
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आली. मात्र ९०च्या दशकानंतर तिची जादू कमी झाली. 'कहो ना प्यार हैं', 'गदर' या चित्रपटातून तिला मिळालेली प्रसिद्धी पुन्हा कधीच मिळाली नाही. अनेक वर्षानंतर ती पुन्हा 'गदर २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र त्यानंतर तिचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय.